चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर व उपसरपंच रवींद्र जाधव यांचा भाजपात प्रवेश

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण तालुक्यातील चाफेखोल सरपंच रवीना राजेंद्र घाडीगावकर व उपसरपंच रवींद्र जाधव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश केला आहे.
त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय निकम ,बंडू गावडे, संतोष गावकर, वीरेश पवार, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





