काँग्रेस पक्ष निरीक्षक तौफिक मुलानी तातडीने कणकवली येणार

पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये होणार काँग्रेसची बैठक
तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची माहिती
कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या आज होणाऱ्या बैठकीसाठी कणकवली विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले पक्ष निरीक्षक तौफिक मुलानी हे आज तातडीने कणकवलीत दाखल होत असून त्यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली काँग्रेसची बैठक काँग्रेस कार्यालयात होणार आहे. काँग्रेस प्रदेश कार्यालयाहून त्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीनंतर काँग्रेसची कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रणनीती व रूपरेषा ठरणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिली माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते आजमावून घेण्याकरिता तौफिक मुलानी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पक्ष निरीक्षक म्हणून ते आज कणकवलीत दाखल होत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे आजच्या बैठकीला अजून महत्व प्राप्त झाले आहे.





