भजन क्षेत्रातील तज्ञ,विशारद,अलंकार पदवीप्राप्त जाणकारांची बैठक भजनी कलाकार संस्थेचे संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

जिल्ह्यातील भजनी कलाकारांना राज्यात झळकविण्यासाठी विशेष रणनीती.

कणकवली/मयूर ठाकूर : “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग”यांच्या वतीने आयोजित बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह कणकवली येथे संपन्न झाली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रात असलेले तज्ञ,विशारद,अलंकार पदवीप्राप्त जाणकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या भजन स्पर्धा तसेच त्यांचे आयोजन यावर प्रदीर्घ चर्चा या बैठकीत करण्यात आली असून सदर बैठकीत भजन क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि भजन स्पर्धामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी परीक्षक मंडळींसोबत चर्चा करून जिल्ह्यात संपन्न होणाऱ्या भजन स्पर्धांसाठी एकच नियमावली तयार करण्यात आली.तसेच या नियमावलीला सर्वांच्या पाठिंब्याने मान्यता देण्यात आली असून जिल्ह्यातील अन्य सर्व परीक्षक जाणकारांशी चर्चा करून ही नियमावली जिल्ह्याभरात त्वरित कार्यन्वित करू,तसेच अशाच प्रकारच्या बैठका आयोजक आणि भजन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसोबत सुद्धा घेणार असल्याचे यावेळी भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष बुवा.संतोष कानडे यांनी सूचित केले.
या बैठकीमध्ये स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या भजनी कलाकारांना जिल्ह्यासोबत राज्यात विशेष स्थान प्राप्त व्हावे यासाठी देखील अध्यक्ष बुवा.संतोष कानडे यांच्या मार्गदर्शनाने विशेष रणनीती आखण्यात आली आहे.जिल्ह्यातील भजनी कलाकार राज्यस्थरीय भजन स्पर्धामध्ये झळकावेत यासाठी हे धोरण जिल्हा संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आले.यामुळे जिल्ह्यातील भजनी कलाकारांना राज्यपातळीवर उच्च दर्जिय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
“भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” च्या वतीने आठही तालुक्यांमध्ये होऊ घातलेल्या “पालकमंत्री चषक 2025” या भजन स्पर्धेचा शुभारंभ देवगड तालुक्यातून 26 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा देखील यावेळी अध्यक्ष बुवा.संतोष कानडे यांनी केली.प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रातील सर्व भजनी कलाकार,जाणकार मंडळी उपस्थित होती.

error: Content is protected !!