खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांना जि. प. निवडणुकीसाठी खारेपाटण भाजपाचे पाचही बूथ अध्यक्ष, ग्रा. पं. सदस्यांचा पूर्ण पाठिंबा – महेंद्र गुरव, उपसरपंच यांची माहिती

नुकतेच सिंधुदुर्ग जि. प. सदस्य पदाच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या. यामध्ये खारेपाटण जि.प. मतदार संघाला ना. मा. प्रवर्ग महिला राखीव देण्यात आले. यामुळे खारेपाटण मधून जि. प. निवडणुकीसाठी भाजपा कडून अनेक इच्छूक उमेदवारांनी निवडणुक रिंगणात उतरायला तयारी दाखवली आहे. यामध्ये भाजपा कडून पाच महिला उमेदवार इच्छूक आहेत. यामध्ये सरपंच प्राची इस्वलकर, अंजली कुबल, तृप्ती माळवदे, उज्वला चिके, कीर्ती शेट्ये यांच्या नावाची चर्चा होतं आहे. पुढे पक्ष जो निर्णय देईल त्याच्याशी सहमत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
या निवडणुक पार्श्वभूमीवर खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव यांनी खारेपाटण सरपंच यांच्या उमेदवारी ला पाठिंबा दर्शवत… खारेपाटण मधील पाचही भाजपा बूथ अध्यक्ष तसेच ग्रा. पं. सदस्यांचा सरपंच प्राची इस्वलकर यांना पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव यांनी दिली.





