खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण

तळेरे भाजपाकडून दिलीप तळेकर तर खारेपाटण मधून रमाकांत राऊत, सूर्यकांत भालेकर इच्छुक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांचा मनासारखे आरक्षण न पडल्यामुळे निराशा मिळाली तर नव्या इच्छुक उमेदवाराना सुवर्णसंधी मिळाली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात मोडणारे खारेपाटण व तळेरे हे दोन पंचायत समिती मतदार संघ सर्वधारण म्हणून जाहीर झाले आहेत. काही इच्छुक असलेल्या उमेदवारांचा च्या पदरी निराशा मिळाली परंतु पर्यायी व सुरक्षित मतदार संघ शोधण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.तर नव्याने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना सुद्धा एक प्रकारची संधी चालून आली असल्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत आहेत.यासाठी सर्वच उमेदवारांची धडपड सुरू आहे. मात्र निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची असणारी भूमिका तसेच युती आणि आघाडी यांची मोर्चेबांधणी याचा सुद्धा उमेदवारी निवडीवर परिणाम होणार आहे.
खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ सर्वधारण झाल्याने इथे सगळ्याच राजकीय पक्षांचे उमेदवार उभे राहण्यास इच्छुक असून अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत उभे राहण्याची दाट शक्यता त्यामुळे आता पासूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे समजते.
"खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ आरक्षण सर्वसाधारण असल्याने भाजपा पक्षाकडून खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत हे निवडणुकी करीता उभे राहणार असल्याचे समजते.तसेच भाजपा चे शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर हे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समजते.तर शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव आणि उबाठा शिवसेना पक्षाकडून तालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांच देखील नाव चर्चेत आहेत. याबरोबरच तळेरे पंचायत समिती मतदार संघ देखील सर्वसाधारण झाल्याने भाजप तालुका अध्यक्ष श्री दिलीप तळेकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहे."
तर सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद मतदार संघ निवडणुकीत खारेपाटण जि.प मतदार संघातून भाजप पक्षाचे श्री रवींद्र उर्फ बाका जठार हे निवडून आले होते.व त्यांनी जि.प.बांधकाम व वित्त सभापती पद देखील सांभाळले होते.तर खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून भाजप पक्षाच्या सौ तृप्ती माळवदे या निवडून आल्या होत्या. यावेळी याबरोबरच तळेरे पं.स.च मतदार संघातून माजी पं.स. सदस्य व सभापती श्री दिलीप तळेकर यांना पुन्हा एकदा उभे राहण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून युती आणि आघाडीच्या खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील व पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.





