कणकवली नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून संदेश पारकर पुन्हा?

ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील?

संदेश पारकर यांच्या उमेदवारीवर काय निर्णय होतो हे लवकरच स्पष्ट होणार

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी कडून संदेश पारकर यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जोरदार मागणी पुढे येऊ लागली आहे. महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत ही मागणी समोर आली असून या मागणीला पक्षाच्या वरिष्ठांचा देखील हिरवा कंदील असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र संदेश पारकर यांनी अन्य कुणालाही उमेदवारी द्या असे मत व्यक्त केले असले तरी तूर्तास महाविकास आघाडीकडे संदेश पारकर हेच प्रमुख संभाव्य उमेदवार असल्याचे समजते. संदेश पारकर यांच्या निवासस्थानी आज ही बैठक घेण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, उमेश वाळके, कन्हैया पारकर प्रसाद अंधारी, दादा परब, सामाजिक कार्यकर्ते, सुदीप कांबळे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, अनिल डेगवेकर , उपस्थित होते. तूर्तास कार्यकर्त्यांनी ही मागणी केली असून अद्याप या नावावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संदेश पारकर यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते व पदाधिकारी देखील आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे आता भाजपकडून या पदाकरिता कोण उमेदवार असणार व हे नाव निश्चित केव्हा होणार ते पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!