मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ विभागाच्या वतीने खारेपाटण महाविद्यालयात एम.ए आणि एम.कॉम पदव्युत्तर अभ्यासक्रमास मंजुरी

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र (CDOE) यांच्या माध्यमातून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एम ए व एम कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमास चालू शैक्षणिक वर्षापासून मंजुरी मिळाली असून यामुळे ग्रामीण भागातील पदव्युत्तर उच्च शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
खारेपाटण महाविद्यालयात सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षा पासून सुरू करण्यात येत असलेल्या एम ए व एम कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संदर्भात नुकताच एक सामंजस्य करार मुंबई विद्यापीठ येथे संचालक,दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र मुंबई विद्यापीठ आणि कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्यात दि.१० ऑक्टोंबर २०२५ रोजी करण्यात आला.त्यामुळे आता खारेपाटण दशक्रोशीतील असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तसेच परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या गावातच उच्च शिक्षण घेण्याची कवाडे येथील खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने खुली झाली आहेत.
याबाबत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष श्री भाऊ राणे,सचिव – श्री महेश कोळसुलकर व सर्व विश्वस्त यांच्या वतीने खारेपाटण महाविद्यालयात नव्याने मंजुरी मिळालेल्या एम ए व एम कॉम अभ्यासक्रम संदर्भात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे.त्यांनी आपली नावे दि.१६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे नोंदवावीत.असे आवाहन खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी. कांबळे यांनी केले आहे.





