आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये सरस्वती पूजन उत्साहात

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेत विद्येची देवता सरस्वती चे पूजन मोठ्या उत्साहात पार पडले.
या निमित्ताने सर्वप्रथम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर तसेच सल्लागार डी.पी तानावडे सर आणि आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शारदा मातेच्या चरणी संगीतमय भजन रुपी सेवा सादर केली,इयत्ता पहिली ते तिसरीच्या चिमुकल्यांनी रास जागर सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमासाठी ज्ञानादा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, सल्लागार डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.





