जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी

केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल
जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार चौकशी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या तक्रारीची मुंबई येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलिस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे (BS&F) पाठविली आहे. त्यामुळे या प्रकरणाला
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँक फसवणुकीची तक्रार जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी केली होती. त्यामध्ये कर्जाच्या रक्कमांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. हे व्यवहार माजी आ. राजन तेली यांच्यासह आठ जणांनी सन 2021 ते 2022 या कालावधीत केलेले आहेत. याप्रकरणी माजी आ. राजन तेली यांच्यासह आठ जणांच्या बॅंक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक,
केंद्रीय अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, मुंबई यांनी दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेकडुन बॅंकेचे कर्जदार प्रथमेश राजन तेली, सर्वेश राजन तेली, प्रदीप मनोहर केरकर, शैलजा एम. सिंगबाळ, सीमा महेश सबनीस, राजन कृष्णा तेली, रुजिता राजन तेली,सुनील कृष्णा निरवडेकर आदींनी कर्जाच्या रक्कमांचा चुकीचा पद्धतीने वापर केल्याची तक्रार केली होती. याबद्दल जिल्हा बॅंकेच्या कर्ज विभागाने केंद्रीय अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा मुंबई यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार संबंधीताची चौकशी करण्याचे आदेश २२ सप्टेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे दिल्याने खळबळ उडाली आहे.
कणकवली प्रतिनिधी





