श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टची सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापना

विश्वस्त विशाल कामत यांची पत्रकार परिषदेत माहिती

गोरगरिबांसाठी रुग्णवाहिका, अन्नदान , शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक उपक्रम

कणकवली शहराचे देखील सुशोभीकरणाचे महत्त्वपूर्ण काम करणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साईभक्तांनी एकत्र येत श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य, शैक्षणिक, रोजगार विषयक यासह समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच कणकवली शहर सुशोभीकरणाचे काम ट्रस्टद्वारे केले जाणार आहे. विद्यार्थी अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे. जिल्ह्यात सध्या युवक-युवती आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा मानोसोपचार तज्ज्ञांशी त्यांचा संवाद घडवून आणणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त विशाल कामत यांनी दिली. तसेच ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, त्यांनी ट्रस्ट समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. कामत यांनी केले.
जानवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. कामत बोलत होते. यावेळी राजन परब, सचिन म्हाडगुत,अमोल नष्टे,गणेश काटकर हे उपस्थित होते.
साईबाबाचा मी भक्त आहे. १४ वर्षांपूर्वी ठाणे ते शिर्डी अशी पायीवारी केली. त्यानंतर कणकवली ते शिर्डी पायीवारी सुरु केली. त्यानंतर साईबाबाच्या पादुका दर्शनाचा सोहळा सिंधुदुर्गात करण्यात आला. या सोहळ्यातनिमित्ताने जमा झालेली रक्कमपैकी कार्यक्रमासाठी खर्च केली. उर्वरित २ लाख रक्कम ही साईबाबा संस्थांच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केली. याबाबद्दल साईबाबा संस्थानाचे अध्यक्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह््यातील साई भक्तांचे आभार मानले. तसेच प. पू. भालचंद्र महाराज यांच्या संस्थान परिसरात कामत कुटुंबीयांचे दत्त मंदिर आहे, असे विशाल श्री. कामत यांनी सांगितले.
साईभक्तांनी एकत्र येत श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केली आहे. या ट्रस्ट माध्यमातून आगामी काळात आरोग्य, शैक्षणिक, रोजगार यासह समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. गोरगरीब रुग्णांसाठी कार्डिओलॉजी रुग्णवाहिका पहिल्यांदा कणकवलीत त्यानंतर जिल्ह्यात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. किडनीग्रस्त लोकांसाठी डायलेसिसीची व्यवस्था केली जाणार आहे. सिंधुदुगार्तील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी गावोगावी आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी महानगरांमधील रुग्णांचा आधार घ्यावा लागतो. त्यांना ट्रस्ट व आरोग्य क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कमी किंमतीच किंवा मोफत शस्त्रक्रिया होण्यासाठीची व्यवस्था उभी केली जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील विद्यार्थी अधिकारी बनावेत, याकरिता तज्ञ मार्गदर्शक आणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार असल्याचे कामत यांनी सांगितले.
आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. त्यामुळे महानगरांमध्ये कंपन्यांमध्ये उपलब्ध आवश्यक असलेल्या कुशल कामगारांची गरज या मेळाव्यातून भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या स्थितीत मतदकार्य होण्याकरिता ट्रस्टच्या माध्यमातून एक नवी व्यवस्था उभी केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह््यात अलीकडच्या काळात युवक व युवती आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शाळा,कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे मानोसोपचार तज्ज्ञांद्वारे समुपदेशन केले जाणार आहेत. तसेच शहरांचे सुंदर व स्वच्छ करण्यासाठी याकरिता ट्रस्टद्वारे सुशोभीकरण केले जाणार आहे. ट्रस्ट स्थापन करण्याची मागील उद्देश आहे. ही ट्रस्ट धमार्दाय नोंदणी करण्यात येत आहे. ट्रस्टमाध्यमातून अन्नदान केंद्र सुरू केले जाणार आहे. गोरगरीबांना ५ ते १० रुपयांमध्ये पोटभर अन्न दिले जाणार आहे. कोरोना काळात कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!