झाराप फाटा येथील अपघातात विद्यार्थी ठार

दोन विद्यार्थी जखमी
संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
मुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या कारने एका दुचाकी मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा राज पेडणेकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर या मोपेड वर असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता झाला. त्यानंतर महामार्गावरच मृतदेह ठेवत सं संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
आज सरस्वती पूजनाचा दिवस असून सरस्वती पूजन करून लवू रवींद्र पेडणेकर, राज पेडणेकर, व सोहम परब हे साळगाव नाईकवाडीतील साळगाव हायस्कूलमध्ये दहाव्या इयत्ता शिकणारे विद्यार्थी आपले मोपेड स्कूटर घेऊन झाराप तिठा क्रॉस करीत असताना मुंबईकडे जाणाऱ्या भरदार कारने त्यांना उडविले. त्यातील राज पेडणेकर हा जागीच ठार झाला. तर लवू पेडणेकर व सोहम परब हे गंभीर जखमी झाले. जखमी ना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनास्थळी तात्काळ पोलीस पोचले असले तरी अनेक अपघातांमुळे त्रस्त झालेल्या झाराप परिसरातील नागरिकांनी तो मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.





