पालकमंत्री नितेश राणेंनी आदेश दिले आणि कणकवलीतील “त्या” शेडचे काम तात्काळ मार्गी लागले!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेधले होते लक्ष
विद्यार्थी, पालक व प्रवासी वर्गांमधून समाधान व्यक्त
कणकवली शहरात पटकी देवी या ठिकाणी असलेल्या बस थांब्याच्या प्रवासी निवारा शेडची दुरावस्था झाल्याबाबत कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. व यानंतर लगेचच त्याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देत प्रवासी निवारा शेड चे तात्काळ काम मार्गी लावून घेतले. या शेडमध्ये कणकवली शहरातील नागरिकांसह कणकवली ते नागवे एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना, विद्यार्थ्यांना देखील ही शेड उपयोगी ठरते. मात्र गेली कित्येक वर्षापासून या शेडची दुरावस्था झाली होती. माजी नगराध्यक्षांनी वेधलेले लक्ष आणि पालकमंत्र्यांची कार्य तत्परता यामुळे या शेडचे काम अवघ्या काही दिवसांमध्ये मार्गी लागले. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कणकवली पटकीदेवी या ठिकाणी कणकवली ते नागवे मार्गावर जाणाऱ्या अनेक विद्यार्थी तसेच अनेक प्रवासी थांबून असतात. या शेडची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी या ठिकाणी चांगली सुविधा नव्हती. परंतु माजी नगराध्यक्षांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यानी या प्रश्नी पालकमंत्र्यांची लक्ष वेधले . पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचे तात्काळ आदेश देत हे काम तातडीने मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या व अवघ्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण देखील झाले. त्यामुळे या ठिकाणी थांबणाऱ्या प्रवासी वर्गातून व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





