कासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाडये याची फेरनिवड

कासार्डे येथील सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव उर्फ आण्णा खाडये याची फेरनिवड करण्यात आली आहे. कासार्डे येथे माजी जि.प.सदस्य तथा सल्लागार संजय देसाई याच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी अभिजीत शेटये, राकेश मुणगेकर, सचिव सचिन राणे, सहसचिव रूपेश कानसे, खजिनदार राहूल उर्फ राजू शेटये, सहखजिनदार वैभव माळवदे याची निवड करण्यात आली तसेच कार्यकारणी सभासद व सल्लागार याची नावे कायम ठेवण्यात आली.
दरवर्षी सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच वर्षभर सामाजपयोगी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस संजय देसाई, नितीन उर्फ पप्या लाड, श्रीपत पाताडे, राजेंद्र सावंत, सुधाकर रावले, रमेश मुणगेकर, गुरूप्रसाद सावंत, डाॅ. किरण गुजर, प्रविण पोकळे, सुधीर रजपूत, विद्याधर नकाशे, यांच्यासह सल्लागार, सभासद व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





