कार ने जोरदार धडक दिल्याने हरकुळ येथील महिला गंभीर जखमी

कणकवली पटवर्धन चौकात शुक्रवारी रात्री 10.45 च्या सुमारास अपघात
धडक दिल्यानंतर पळून जाणाऱ्या कारचालकाला बेदम चोप
गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कार ने कणकवली पटवर्धन चौकात दुचाकीने जात असलेल्या एका जोडप्याला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवर असलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर कारचालक पुन्हा पटवर्धन चौकात कार वळून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र स्थानिकांनी त्याला पुजारी इलेक्ट्रॉनिक्स समोर पकडून बेदम चोप दिला. यानंतर घटनास्थळी गर्दी जमलेली असताना सदर कारचालक हा कार (R J 06 cd 8010) घेऊन पुन्हा पाळण्याचा प्रयत्न करत असताना हॉटेल मिंटलिफ समोर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. हरकुळ देऊळवाडी येथील गणेश घाडीगावकर हे त्यांची पत्नी व मुलासोबत कणकवलीतून जात असतात ही घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या जखमी महिलेला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. त्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





