कणकवली शहर मंडलातील भाजपा नाटळ जिल्हा परिषद गटाची सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा पंधरवडा अभियान’ अंतर्गत नाटळ जिल्हा परिषद गटाची नियोजन कार्यशाळा गुरुवार दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय कार्यालय कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष संजना संदेश सावंत आणि -माजी जि प अध्यक्ष- संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
या अभियानांतर्गत मंडळस्तरीय खालील उपक्रम घेण्याचे ठरले.
1. रक्तदान शिबिर,
2. बूथ स्तरावर स्वच्छता अभियान, ‘
3. एक पेड़ माँ के नाम’ वृक्षारोपण,
4. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि ‘ मन की बात ‘ आदी उपक्रम विभागात राबविले जाणार आहेत.
यावेळी नाटळ जिप मतदार संघातील सर्व सरपंच, उप सरपंच व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!