कुडाळ न. प. चे सीओ अरविंद नातू यांची बदली

कोकण भवन येथे सह आयुक्त म्हणून नवी जबाबदारी

कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांची कोकण भवन येथे सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे. प्रशासकीय नियमित बदली होण्यासाठी आठ महिने बाकी असताना ही बदली झाली आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी म्हणून अरविंद नातू यांनी दोन वर्षांपूर्वी कार्यभार हातात घेतला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा सह आयुक्त तसेच सावंतवाडी, वैभववाडी अशा नगरपंचायतीमध्ये प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. दोन दिवसापूर्वी त्यांची कोकण भवन येथे सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

error: Content is protected !!