कणकवलीत भाजपाच्या वतीने ‘रांगोळी स्पर्धे’चे आयोजन

शालेय व खुल्या गटातील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह

कणकवली शहर भाजपाच्या वतीने ‘विकसित भारत सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भालचंद्र महाराज मठ, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत शालेय गट आणि खुला गट अशा दोन विभागांत सहभागी होता येणार आहे. शालेय गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन कणकवली शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क :
सुप्रिया नलावडे – 9422070340
आर्या राणे – 9763030152
मनस्वी ठाणेकर – 7057532007 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!