कणकवली जांभवडे एसटीच्या वाहकाने मद्यपान करून विद्यार्थ्यांना धमकावल्याचा आरोप

भाजपा शिष्टमंडळाकडून आगार व्यवस्थापक गायकवाड यांना घेराव

त्या वाहकावर निलंबनाच्या कारवाईची मागणी

कणकवली जांभवडे या वस्तीच्या एसटी वर कार्यरत असणाऱ्या वाहकाने मद्यपान केल्याचा आरोप करत कणकवली तालुका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक अजय गायकवाड यांना घेराव घातला. आगार व्यवस्थापकांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर करण्यात आले. त्यावेळी त्या वाहकाची अल्कोहोल टेस्ट करा व त्याच्यावर तातडीने कारवाई करा अशी मागणी करत भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह भाजपा शिष्टमंडळाने करत आक्रमक भूमिका घेतली. सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांच्या सहित कार्यकर्त्यांनी या बाबत त्या वाहकावर कारवाई झाल्याशिवाय इथून हलणार नाही असा पवित्र घेतला. या सदर वाहकाने करूळ हायस्कूल ते पाचोबा देवस्थान इथपर्यंत प्रवास करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवासाचा तिकीट दर 11 रुपये असताना या मुलांकडून करूळ ते फोंडा 16 रुपये तिकीट जबरदस्तीने दिले. व त्याबद्दल या एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता त्यांना अश्लील व घाणेरड्या शिव्या घालत धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच सदर विद्यार्थ्यांना गाडीतून खाली उतरून देण्याची धमकी दिल्याचा आरोप कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांनी केला आहे. दरम्यान या बाबत तातडीने कारवाई करा अशी लेखी पत्राद्वारे मागणी श्री सरपंच तेंडुलकर यांनी केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत,राजू पेडणेकर, अनंत तानवडे,समीर प्रभुगावकर,राजा डीचोलकर,गणपत मानगावकर,प्रज्वल वर्दम,राहुल आंगणे, घनश्याम राणे,संतोष कदम,महेंद्र कुडाळकर,बाबू घाडीगांवकर, हुले,सचिन खेडेकर, प्रकाश पेडणेकर आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!