आचरा येथील बाबा वडापाव सेंटर चे मालक राजन आंबेरकर यांचे निधन


आचरा येथील बाबा वडापाव सेंटर चे मालक माजी ग्रामपंचायत सदस्य राजन उर्फ बाबा मनोहर आंबेरकर वय 59 यांचे बुधवार 10 सप्टेंबर रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते आचरा व्यापारी संघटनेचे सदस्य तर रिक्षा संघटनेचे माजी पदाधिकारी होते. त्यांच्या निधनाबद्दल आचरा व्यापारी संघटनेतर्फे दुकाने बंद ठेवून तसेच रिक्षा व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा परीवार आहे.

error: Content is protected !!