भाजपाचे  राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सपत्नीक घेतले कुणकवण मधील घरच्या गणपतीचे दर्शन

आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देवगड तालुक्यातील कुणकवण येथील आपल्या मूळ गावतील घरच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. शनिवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी भाजपा नेते तावडे हे कुणकवण येथील आपल्या मूळ घरी दाखल झाले.आपल्या घरच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेत बाप्पाच्या चरणी तावडे दाम्पत्य नतमस्तक झाले. यावेळी उद्योजक हरेश जनक, कुणकवण सरपंच जितेंद्र कदम, पोलीस पाटील छोटू राणे, विनोद तावडे यांचे बंधू विलास तावडे, रमेश तावडे, माजी सरपंच मनोहर सावंत आदी उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!