खारेपाटण मध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का

ठाकरे सेनेचे माजी युवा तालुकाप्रमुख तेजस राऊत व माजी जि. प. संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या सह असंख्य कार्यकर्त्याचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश
पालकमंत्री नितेश राणे यांनी केले पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत
खारेपाटण येथे काल दि. १६ ऑगस्ट रोजी भाजपा पक्ष पुरस्कृत उद्योजक सतीश गुरव यांच्या सौजन्याने खारेपाटण येथे दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी खारेपाटण दहीहंडी कार्यक्रमास भेट दिली. या प्रसंगी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत व भाजपा कार्यकर्ते संकेत लोकरे यांच्या नेतृत्वाखाली खारेपाटण येथील ठाकरे सेनेचे माजी युवा तालुकाप्रमुख तेजस राऊत व माजी जि. प. संपर्क प्रमुख सतीश गुरव, माजी खारेपाटण उपविभाग प्रमुख निखिल गुरव,यांच्या सह शंकर राऊत,किशोर राऊत,महेश राऊत,हर्षद राऊत,चेतन राऊत,संजय जाधव,प्रशांत सावंत,आदेश अफंडकर,सुरेंद्र राऊत,रुपेश राऊत,महेंद्र शिंदे,गजा राऊत,रव्या गुरव,अभी गुरव
मयूर गुरव (अँप्पी),आशिष राऊत,नितेश राऊत,योगेश राऊत,देवेंद्र नार्वेकर,संदीप राऊत
शशिकांत राऊत अश्या असंख्य कार्यकर्त्यानी भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी या सर्वांचे भाजपा पक्षात स्वागत केले. नितेश राणे यांच्या विकासकामाच्या कामगिरीवर विश्वास ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.या प्रसंगी भाजपा चे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, माजी वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार,भाजपा चे जेष्ठ पदाधिकारी-रमाकांत राऊत, माजी पं. स, सदस्य -तृप्ती माळवदे,महिला तालुका कार्यकारणी सदस्य-उज्वला चिके, अंजली कुबल, ग्राम. पं, सदस्य-मनाली होनाळे, साधना धुमाळे, गुरु शिंदे, सुधाकर ढेकणे, जयदीप ढेकणे, मंगेश ब्रह्मदंडे,शक्ती केंद्र प्रमुख -सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर, राजू वरुणकर शेखर शिंदे, भाऊ राणे, संकेत लोकरे,चिन्मय तळेकर, किशोर माळवदे, सुहास राऊत, राजा जाधव, योगेश पाटणकर, गणेश कारेकर आदी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजप पक्षात प्रवेश केलेले युवा कार्यकर्ते यांनी तेजस राऊत यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून भाजप पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले.व भाजप पक्षाला खारेपाटण मध्ये अधिक जोमाने वाढवणार असल्याचे देखील सांगितले.”तर मंत्री नितेश राणे यांनी खारेपाटण गावच्या विकासाला चालना देण्यासाठी सतीश गुरव आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते यांनी जसा दहिहंडी साठी उंच थर लावण्यासाठी खांदा दिला जातो तसा आपण उंचच उंच विकासाची दहीहंडी बांधण्यासाठी एकत्र मिळून कार्य करूया असे सांगितले तर माझ्या पालकमंत्री काळात खारेपाटण गावातील प्रलंबित विकासकामांसाठी एकही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन खारेपाटण मधील ग्रामस्थांना नामदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिले.”





