पिंगुळीत क्षुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांची स्थानिक युवकांना मारहाण

पिंगुळी गूढीपूर येथील घटना
क्षुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांनी स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे रात्री ८ च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक दोन तरुण आणि तीन परप्रांतीय तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. यानंतर तीन परप्रांतीय युवकांनी दोघा स्थानिक युवकांना आपल्या खोलीत नेऊन मारहाण केली. यातील एका युवकावर फावडे मारून गंभीर जखमी केले. याची तत्काळ माहिती मिळताच स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक युवकांची सोडवणुक करून पोलिसांना खबर दिली.
दरम्यान गंभीर जखमी युवकाला जिल्हा रुग्णल्यात हलविण्यात आले आहे. पिंगुळी ग्रामस्थांनी कुडाळ पोलीस ठाण्यात गर्दी करून त्या परप्रांतीयावर कारवाईची मागणी केली आहे.





