उद्योजक रुपेश सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी

खारेपाटण पंचक्रोशीतील 400 महिलांना दिली मोफत श्री जोतिबा,श्री महालक्ष्मी,अदमापूर श्री बाळूमामा देवदर्शन सहल
समस्त महिला वर्गाने मानले रुपेश सावंत यांचे आभार
खारेपाटण गावचे सुपुत्र डोंबिवली येथील युवा उद्योजक रुपेश सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जपत 14 ऑगस्ट रोजी खारेपाटण सह चिंचवली बेर्ले कुरांगवणे शेर्पे वा्यंगणी आदी पंचक्रोशीतील 400 महिलांना उद्योजक रुपेश सावंत यांनी जोतिबा कोल्हापूर श्री महालक्ष्मी अदमापूर श्री बाळूमामा दर्शनाचा लाभ मिळवून दिला. रुपेश सावंत यांनी याआधी देखील 2वर्ष अश्याच प्रकारे महिलांना मोफत देवदर्शन सहल आयोजित केली होती. आता हे सहलीचे 3वर्ष आहे.
दैनंदिन कामाच्या दगदगीतून एक दिवस विश्रांती घेत देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. रुपेश सावंत यांच्यामुळे आम्हला जोतिबा महलक्ष्मी बाळू मामा दर्शनाची संधी मिळाली हे सांगताना समस्त महिला रुपेश सावंत यांना धन्यवाद देत आशीर्वाद ही देत होत्या.संपूर्णसहल ही अत्यंत नियोजन पूर्ण व महिला भगिनींची सुरक्षेची काळजी घेत अत्यंत उत्साहात पार पडली. सर्व महिला रुपेश सावंत यांचे भरभरून कौतुक करताना दिसत होत्या. या देवदर्शन सहली चा महिला वर्गाने अत्यंत उत्साहात आनंद लुटला.
9 एसटी बसेस मधून या 400 महिला 14 ऑगस्ट रोजी देवदर्शनाला रवाना झाल्या. या सर्व भाविक महिलांच्या चहा नाश्ता दुपार आणि रात्रीच्यासुद्धा भोजनाची व्यवस्था रूपेश सावंत यांनी स्वखर्चाने केली आहे.सहली दरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेत खास या सहलीसाठी डॉक्टर सुद्धा सोबत होते. खारेपाटण गावचे ग्रामदेवत श्री कालभैरव मंदिरात सुखरूप प्रवासासाठी साकडे घालण्यात आले. युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊ राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सर्व एसटी बस देवदर्शन साठी मार्गस्थ झाल्या. नियोजनासाठी रोटरी क्लब खारेपाटण तसेच तालुका समन्वय समितीने सहकार्य केले.यावेळी
सामाजिक कार्यकर्ते व आयोजक श्री रुपेश सावंत,श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मदिर ट्रस्ट खारेपाटण चे अध्यक्ष श्री मधुकर गुरव,भाऊ राणे,सुहास राऊत, खारेपाटण तालुका निर्मिती समिती अध्यक्ष – रमाकांत राऊत,मंगेश गुरव,महेश कोळसुळकर ,संतोष पाटणकर गुरुप्रसाद शिंदे, ग्राम पंचायत सदस्य जयदीप देसाई,किरण कर्ले,
रोटरी क्लब खारेपाटण अध्यक्ष दयानंद कोकाटे,हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप,अजय गुरसाळे,सतीश नाईक,मोहन कावळे,सुबोध देसाई,चंदू जाधव,शिवाजी राऊत,बाळा राऊत,आदी उपस्थित होते.





