कुडाळ न प च्या वतीने शहरात ज्ञानेश्वर पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीचे औचित्य

नगरपंचायतीमार्फत शहरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जयंती आहे. शासनाकडून हा जयंती उत्सव साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमार्फत शहरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
न.पं. कडून या पालखी सोहळ्याला भर पावसात सुरुवात झाली. गांधीचौक, राजमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बाजारपेठ मार्गे परत नगरपंचायत कार्यालय असा हा पालखी सोहळा पार पडला. यात नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, मुख्याधिकारी अरविंद नातू, गटनेता विलास कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, लेखापाल स्वप्नील पाटील, नगर रचनाकार शिवप्रसाद ढूंडगे, पाणी पुरवठा अभियंता रसिका प्रभावळकर, दत्तात्रय म्हाडेश्वर, संकेत गावडे, प्रसाद नाईक, वामन राणे, सागर कुंभार, सचिन महाडदळकर, गजानन पेडणेकर, केतन पवार, शैलेश नेवाळकर, हनुमंत पाटकर, अंजली परब, संजय टेबुलकर, रोहित परब, गिरीश केसरकर, योगेश नाईक, साहिल कुडाळकर, सिद्धेश ठाकूर, वैष्णवी पेडणेकर, दिक्षा काळप, नेहा सोलकर, सुहानी सावंत, सबा शाह आदींसह न.पं. अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!