खारेपाटण येथील जि.प.च्या ३ प्राथमिक शाळांना बसविण्यात आले सी सी टी व्ही कॅमेरे

खारेपाटण ग्रामपंचायती चा पुढाकार
खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील जिल्हा परिषदेच्या प्रमुख ३ प्राथमिक शाळांमध्ये सी सी टी व्हि कॅमेरे बसविण्यात आले असून गावाच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर व उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या शुभ हस्ते नुकताच या सी सी टी कॅमेरा प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.
सद्या सी सी टी वी बसविण्यात आलेल्या शाळामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेमध्ये ४ कॅमेरे,तसेच जि.प.शाळा रामेश्वर नगर खारेपाटण येथे ४ कॅमेरे तर जि.प. शाळा संभाजी नगर , खारेपाटण या शाळेत ३ कॅमेरे असे एकूण ११ सी सी टी वी कॅमेरे खारेपाटण गावातील शाळांमध्ये बसविण्यात आले असून लवकरच गावातील उर्वरित शाळांमध्ये देखील सी सी टी वी कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी दिली.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी खारेपाटण ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करून शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळामध्ये सी सी टी वी कॅमेरे बसविण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले. तर ग्रामस्थ आणि पालक यांच्या वतीने देखील खारेपाटण ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करून समाधान व्यक्त करण्यात आले.




