कणकवलीत गुरुकृपा हॉस्पिटलच्या आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) सेंटर चा 15 ऑगस्ट रोजी शुभारंभ

राज्याचे मत्स्योद्योग बंदर विकास व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

खासदार नारायण राणे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेत एक नवीन सुविधा रुजू होणार

गुरुकृपा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून ivf (टेस्ट ट्यूब बेबी) सेंटरच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा 15 ऑगस्ट रोजी राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. गुरुकृपा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कलमठ कणकवली च्या डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. प्रवीण बिरमोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. गुरुकृपा हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली 27 वर्षे वैद्यकीय सेवा देत असताना टेस्ट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून माफक दरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये अनेक अद्ययावत तंत्रज्ञानासह नवनवीन मशनरी देखील या हॉस्पिटलच्या सेवेत रुजू होत असून याचा सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना फायदा होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा काळगे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. शमिता बिरमोळे व डॉक्टर प्रवीण बिरमोळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!