कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिवस महाविद्यालयात उत्साहात साजरा

खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी भूषवले, तर प्रमुख वक्ते म्हणून रश्मी देसाई मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये ग्रंथालयाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, ज्ञानप्राप्ती व वाचनसंस्कृती वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी विचार मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनीही यावेळी ग्रंथप्रेम आणि वाचनावरील आपले अनुभव आणि विचार मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल तन्मय कांबळे यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवर, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले.




