परिसर स्वच्छता ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.

स्वच्छतेद्वारे समाजातील सर्व नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनास लाभ होईल. -संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था

फोंडाघाट बस स्थानकात जीवन आनंद संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान

जीवन आनंद संस्था, फोंडाघाट यांच्या वतीने फोंडाघाट बस स्थानक परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समाजात स्वच्छता आणि आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या अभियानात सरपंच सौ. संजना संजय आग्रे, माजी सभापती सौ. सुजाता हळदिवे, जीवन आनंद संस्थेच्या स्वयंसेविका सुवर्णा रावराणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुभाष सावंत, श्री. पवन भोगले, श्री. मिथिल सावंत (पटेल), प्राची धुरी, अवंती सावंत, अनुजा सावंत, संस्थेचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्वच्छता मोहिमेदरम्यान बस स्थानक परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. परिसर स्वच्छ करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध घोषवाक्ये आणि पोस्टर्सचा वापर करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. संदिप परब यांनी सांगितले की, “समाजामध्ये स्वच्छता ही केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण आपल्या परिसराची काळजी घेतल्यास आरोग्यदायी व सुखकर जीवनशैली शक्य आहे.” या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी जीवन आनंद संस्थेचे कौतुक केले असून, “अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!