नगर वाचनालय कणकवली येथे रोटरी क्लब कणकवली आयोजित एक राखी व्यसनमुक्तीची उपक्रम संपन्न

सफाई कर्मचाऱ्यांना बांधण्यात आली व्यसनमुक्ती ची राखी
नगर वाचनालय कणकवली येथे रोटरी क्लब आयोजित “एक राखी व्यसनमुक्तीची” या उपक्रमात, डॉ. नेरुरकर प्रेरित प्रज्ञांगणच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चासत्र अत्यंत उत्साहवर्धक व भावनिक ठरली.विशेष म्हणजे, स्पर्शिका मदभावे हीने सादर केलेल्या मनस्पर्शी कवितेमुळे सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. नगर सफाई कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती ची राखी बांधाण्यात आली.सफाई कर्मचाऱ्यांनी तिला खाऊ देत “आम्ही यापुढे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणार,आणि तू आम्हाला अधूनमधून भेटायला यायचं” असे भावुक शब्द उच्चारले.
अशा उपक्रमांमुळे डॉ. नेरुरकरांचे ‘व्यसनमुक्त सिंधुदुर्ग’ हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, यासाठी आपणा सर्वांची मोठी साथ मिळत आहे, हीच खरी प्रेरणा आहे. असे मत प्रज्ञांगणच्या संस्थापिका श्रावणी मदभावे यांनी मांडले.
या अर्थपूर्ण कार्यक्रमासाठी रोटरी क्लब कणकवलीचे मनःपूर्वक आभार तसेच सौ.गांगण, सौ.नलावडे आणि सर्वच रोटेरियन सदस्यांचे सदैव सहकार्य व प्रेरणादायी साथ याबद्दल हृदयपूर्वक कृतज्ञता डॉ. नेरुरकर प्रेरित प्रज्ञांगणच्या वतीने व्यक्त करण्यात आली.




