‘एक राखी व्यसनमुक्तीची’ – डॉ. नेरुरकरांच्या संकल्पातून जि. प. कणकवली ३ च्या विद्यार्थ्यांनी घडवली सामाजिक ज्योती

“राखी” या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, गेली १२ वर्षे प्रज्ञांगण तळेरेच्या माध्यमातून डॉ. अनिल नेरुरकर (M.D., अमेरिका) यांच्या मार्गदर्शनाने ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ हा आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जातो आहे. यंदा तेराव्या वर्षी, या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा कणकवली क्र. ३ च्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या बांधल्या आणि त्या राख्यांमधून व्यसनमुक्तीचे सुंदर संदेश देऊन प्रबोधन केले.

या उपक्रमाचा उद्देश – पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून व्यसनमुक्तीसाठी कठोर अंमलबजावणीची विनंती करत, समाजरक्षणाच्या भावनेने एकत्र येण्याचा संदेश देण्यात आला.

अधिकारी वर्ग व मान्यवरांबरोबर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी वृषाली बर्वे मॅडम – PSIनानचे सर – PSIकांबळे सर – PSIघरकर सर – PSI तसेच पोलीस श्रीकांत कुंभार,
तांबे मॅडम,वेंगुर्लेकर सर,सागर जाधव – गोपनीय विभाग विनया सावंत मॅडम ,स्मिता माने मॅडम, शाळा कणकवली क्रमांक तीन चे शिक्षक संतोष घाडीगावकर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती कोतवाल यांनी पोलीस हे समाजाचे रक्षक आहेत पोलीस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत म्हणून समाजातील सर्व घटक सुरक्षितपणे आणि आनंदाने जीवन जगत आहेत आणि म्हणूनच पोलिसांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज हा एक राखी व्यसनमुक्तीची हा रक्षाबंधन सोहळा आयोजित केला आहे असे सांगितले.
या प्रसंगी प्रज्ञांगणच्या संस्थापिका सौ. श्रावणी मदभावे म्हणाल्या,
“डॉ. नेरुरकर सरांच्या प्रेरणेतून आणि जिल्हा परिषद शाळा कणकवली क्र. ३ च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आज आपण व्यसनमुक्तीच्या कार्यात एक नवीन पाऊल टाकले आहे. या कार्यासाठी प्रशासन, पत्रकार, शैक्षणिक संस्था आणि सामान्य नागरिकांची एकत्रित साथ अत्यावश्यक आहे. विशेषत: पोलिस विभागाने दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक कृतज्ञ आहोत, कारण त्यांच्या सहभागामुळे व्यसनविरोधी संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचतो.”

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या बांधताना, त्यावर लिहिलेल्या आणि सांगितलेल्या व्यसनमुक्तीविषयक संदेशांनी उपस्थितांचे मन जिंकले.
उपस्थित मान्यवरांनी प्रज्ञांगणच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील काळातही साथ देण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे डॉ. अनिल नेरुरकर प्रेरित प्रज्ञांगणच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती कार्यासाठी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कोतवाल मॅडम शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा कणकवली क्र. ३ तर आभार प्रदर्शन श्रावणी मदभावे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान कणकवली क्रमांक तीन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अक्षया राणे, श्रीमती प्रतिभा कोतवाल श्री संतोष घाडीगावकर यांनी केले.

error: Content is protected !!