आशिये गावचे मानकरी शाहू गुरव यांचे निधन

माजी पंचायत समिती उपसभापती महेश गुरव पितृशोक
आज ११ वाजता होणार अंत्यसंस्कार
आशिये वरचीवाडी येथील गावचे मानकरी (मळेकार) शाहू आत्माराम गुरव( वय ८२)यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री ११.४५ वाजता राहत्या घरी निधन झाले .गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.
शाहू गुरव हे भजनी बुवा होते.तसेच गावातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. गावचे ग्रामदैवत श्री देव गांगो देवस्थानचे ते मानकरी होते.
कणकवली माजी पंचायत समिती उपसभापती , आशिये गावचे सरपंच महेश गुरव व एसएम हायस्कूलचे शिक्षक मिलिंद गुरव यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे ,भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर आशिये येथील स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कणकवली प्रतिनिधी