कुडाळ तहसील कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

महसूल सप्ताह निमित्त आयोजन

कुडाळ : महसूल सप्ताहाचे औचित्‍य साधून तहसिलदार कार्यालय कुडाळ येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५७ जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
सध्या महसूल सप्ताह सुरू आहे. त्या निमित्ताने तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळच्या तालुका आरोग्‍य अधिकारी वर्षा शिरोडकर यांच्या सहकार्याने हे आरोग्‍य तपासणी शिबिर आयोजित करणेत आले होते. या आरोग्य शिबिरात रक्‍तदाब, रक्‍तातील विविध घटकांची तपासणी तसेच ई. सी. जी. इत्‍यादी तपासण्‍या करण्यात आल्‍या.
उपविभागीय अधिकारी, कुडाळ श्रीमती ऐश्वर्या काळुशे मॅडम यांनी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सहभागी होऊन आरोग्य तपासणी केली. आरोग्‍य विभागातर्फे डॉ. दत्‍तात्रय उमेशचंद्र देसाई, समुदाय आरोग्‍य अधिकारी, श्रीम. प्रथा प्रमोद पाटकर, समुदाय आरोग्‍य अधिकारी, श्रीम. प्रिती चंद्रकांत कुंभार, स्‍टाफ नर्स, श्रीम. रागिणी विष्‍णू गवंडे, आरोग्‍य सेविका, आरोग्यसेवाक भगवान अनंत हुमरमळेकर, त्‍याचप्रमाणे श्रीम. गौरी राऊळ व श्रीम. कृणाली कदम या लॅब टेक्निशियन्‍स उपस्थित होत्‍या.
तहसिलदार कार्यालयातील सर्व अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. आरोग्‍य तपासणी शिबिरामध्ये एकूण ५७ जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

error: Content is protected !!