सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे सुयश

आचरा-अर्जुन बापर्डेकर
युवा संदेश प्रतिष्ठान कणकवली सिंधुदुर्ग आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च( STS )परीक्षा सन 2025 रोजी संपन्न झाली. या परीक्षेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेच्या इयत्ता सहावी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या परीक्षेमध्ये इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु. मिहीर मिलिंद गोवंडे व कु. चैतन्य राजेश सावंत यांना ब्राॅझ मेडल मिळाले असून इयत्ता सहाविचे विद्यार्थी कु. राजेश सतीश सोमनाचे, कु. रितेश रामचंद्र शेठ, कु. यश सतीश लब्दे, कु.समर्थ सुनील धुमडे, कु. पार्थ राजेंद्र कांबळी तसेच इयत्ता सातवीचे विद्यार्थी कु. कौशल माधवराव भोसले, कु. दीप्ती निलेश चेंदवणकर, कु. कृतिका शिवराम आयर, कु. सृष्टी सुरेश पाताडे यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक साटेलकर सर यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व संस्थाचालक, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय घुटुकडे सर, उपमुख्याध्यापिका सौ. माणगांवकर मॅडम , सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.