मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचे यश

आचरा-अर्जुन बापर्डेकर
क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा वराडकर हायस्कूल कट्टा मालवण या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेने सुयश मिळवले आहे.
17 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये कु. वसंत विकास मेस्त्री तर 19 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये कु. ओम विकास मेस्त्री आणि कु. कुणाल लक्ष्मण घाडी यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले असून या विद्यार्थ्यांचे सर्व संस्थाचालक तसेच प्रशालाचे मुख्याध्यापक घुटुकडे सर, उपमुख्याध्यापिका सौ. माणगावकर मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.