माजी आमदार वैभव नाईक यांना पाडण्यासाठी सुशांत नाईक यांनीच केला होता प्लानिंग

नाईकांबद्दल युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांना लवकरच प्रचिती येईल
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांचा टोला
मंत्री नितेशजी राणे व युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री यांचा काम उत्तम लोके यांच्या सारख्या भुरट्यांना कळणार नाही. गुंडांची शिवसेना, भगवी टोळी अशा पद्धतीचे शिवसेनेवर टीका करणाऱ्या नाईकांनी त्याच शिवसेनेत प्रवेश करून स्वतः निष्ठावान कसे हे सांगत आहेत. काँग्रेसला मुठ माती देऊन स्वार्थासाठी आणि सध्या व्यवसाय अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेत गेलेल्या सुशांत नाईक यांनी स्वतः भाऊ माजी आमदार वैभव नाईक याला पाडण्यासाठी काय व्हुव्हरचना आखली हे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नये. वैभव नाईक यांनी कणकवली विधानसभेत स्वतःचा भाऊ सुशांत नाईक याला विधानसभा तिकीट देऊ नका असे वरिष्ठांना सांगून विरोध केला. सुशांत नाईकचे तिकीट कापले म्हणून त्या रागाने सुशांत नाईक याने वैभव नाईक यांच्या विरोधात घरात बसविण्याचा करेक्ट कार्यक्रम केला. अशा नाईकांबद्दल जे कोणाचे झाले नाहीत अशा नाईकांबद्दल लोके यांना लवकरच अनुभव येईल. लोके यांना रेस्ट हाऊस येथे मारहाण झाली कणकवली व कनेडी, फोंडा येथे मारहाण झाली तेव्हा नाईक किती वेळ धाऊन आले यापुढे त्याचा त्यांना अनुभव येईल.
उत्तम लोके यांनी दुसऱ्या ना व्यवसाय चे सल्ले देताना आपण कोणता व्यवसाय करत घर बांधले हे जाहीर करा.
कलमठ मधील अनेक जणांचे देणेकरी असलेले लोके आपल्याला आपल्या कार्यालयात सेंट्रिंगचे पैसे देण्यासाठी आलेल्यांनी मारहाण झालेली विसरलात काय? विरार पूर्व नायगाव चंद्रपाडा येथे आपण ८ दिवस तरी पुनः जाऊन दाखवाल का?दुसऱ्या च्या घरचे पाट्या लावताना तुमचे उधारी चे ,बोर्ड लागणार नाही याची काळजी घ्या
फक्त नाईकांचे तळवे चाटत पद मिळवले यापुढे पुनः टीका केलात तर अजून उरलेलेली प्रकरणे जाहिर करू हे लोके यांनी लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी दिला आहे.




