कलमठ ग्रामपंचायतीचा स्वच्छता जागर

घरोघरी जात करत आहेत ‘स्वच्छ कलमठ संकल्प’ प्रचार
ग्रामस्थानी दिला १००% प्रतिसाद
आज एक ऑगस्ट पासून कलमठ गावात कचरा संकलन नव्या नियमात होत असून , स्वच्छतादूतांसोबत ग्रामपंचायत टीम घरोघरी जाऊन कचरा व्यवस्थापन पत्रक वाटप करत आहे, पहिल्याच दिवशी आज ग्रामस्थानी १००% प्रतिसाद दिला असून नव्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे.अशी माहिती सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.
कलमठ गावातील सामाजिक मंडळे, बचतगट बैठकां नंतर, वाडी कॉलनी मध्ये बैठका सुरू असून त्यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने नव्या नियमांचे स्वागत करून सहकार्याची भावना व्यक्त केली. गावाच्या स्वच्छता विषयी प्रतिसादाने, सहकार्य बद्दल सरपंच संदिप मेस्त्री यांनी आभार व्यक्त केले आहेत. गावात रोज दवंडी दिली जात आहे, आज कचरा संकलन साठी कलमठ बाजारपेठ येथे सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर ,ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे,पपू यादव, श्रेयस चिंदरकर, तेजस लोकरे, कर्मचारी गौरव तांबे, समीर कवठणकर , प्रदीप कांबळी,राजू कोरगावकर उपस्थित होते.




