कनक नगर येथील मालती वर्दम यांचे निधन

शहरातील कनकनगर येथील मालती गुरुदास वर्दम (९२) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सोमवारी येथील मराठा मंडळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.