न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे “कांदळवन संवर्धन आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय कांदळ वन परिसंस्था संवर्धन दिनाचे” औचित्य
आचरा-अर्जुन बापर्डेकर
आंतरराष्ट्रीय कांदळ वन परिसंस्था संवर्धन दिनाचे” औचित्य साधून विभागिय वनाधिकारी कांदळवन दक्षिण कोकण, मा. सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन दक्षिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन कक्ष मालवण व कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे “कांदळवन संवर्धन आणि जनजागृती विषयक” कार्यक्रम संपन्न झाला.
सदरच्या कार्यक्रमात दीपक जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात कांदळवन बद्दल माहिती देऊन केली . कांदळवन वर आधारित उपजिविकेचे महत्त्व पटवून दिले तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व मुलांना सांगितले.
ओमप्रकाश आचरेकर यांनी कांदळवनाची ओळख, कांदळवन संरक्षणाचे महत्व, कांदळवनास असलेले धोके याबाबत सविस्तर माहिती दिली. कांदळवन कक्षा कडून राबविल्या जाणाऱ्या योजनां बाबत माहिती दिली तसेच प्रमोद वाडेकर यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमास स्थानिक स्कूल समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर, कौशल्य विकास केंद्र अध्यक्ष संजय पाटील, उप मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे, सह.शिक्षिका सौं मधुरा माणगावकर, सौं अनघा कदम, सौं लक्ष्मी गोसावी, सहा.शिक्षक श्री सदगुरु साटेलकर, श्री. सखाराम राजम कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र चे कर्मचारी प्रकल्प समन्वयक श्री दीपक जाधव, मोहिनी भिंगारे, पूजा लुटे, वेदिका चव्हाण, प्रकल्प सहाय्यक श्री मयूर पानसरे, समृद्धी कांदळगावकर, कांदळवन सह व्यवस्थापन समिती आचरा जामडूल सदस्या सौं मनस्वी तोडणकर व कांदळवन सह व्यवस्थापन समिती पारवाडी अध्यक्ष श्री प्रवीण परब तसेच गटातील सदस्य श्री अनंत गावडे, महेश तोडणकर, जितेंद्र आचरेकर, प्रमोद वाडेकर, ओमप्रकाश आचरेकर यांसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.