आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मालवण परिमंडळातील हडी येथे कांदळवन वृक्षारोपण आणि स्वच्छतामोहीम उत्साहात

आचरा-अर्जुन बापर्डेकर
आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मालवण परिमंडळातील हडी येथे कांदळवन वृक्षारोपण आणि स्वच्छतामोहीम उत्साहात राबवण्यात आली. कांदळवन वनविभाग महाराष्ट्र, विभागीयवन अधिकारी दक्षिण कोकण, अलिबाग, वनक्षेत्रपाल कांदळवन
कक्ष, मालवण, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि जीसीएफ इसीआरआयसीसी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेला स का पाटील महाविद्यालय मालवण सिंधुदुर्ग चे विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग तसेच , कांदळवन सहव्यवस्थापन समिती
समिती, अध्यक्ष श्री किशोर नरे हडी, अभय गावकर गावकरवाडा, महेश सुर्वे सदस्य कोथेवाडा, श्री रणजित खोत खोतजुवा आणि श्री प्रमोद वाडेकर, अक्षय वाडेकर सदस्य आचरा जामडूल येथील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग दर्शवला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना कांदळवन कक्षाचे वेंगुर्ला परिमंडळ अधिकारी सुनील सावंत यांनी २६ जुलै हा आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिन
का साजरा केला जातो, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कांदळवनांचे संवर्धन आणि संरक्षण का आवश्यक आहे, यावरही त्यांनी विद्यार्थी आणि उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कांदळवन संरक्षण बाबत उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी प्रतिज्ञा घेतली. या महत्त्वपूर्ण उपक्रमात विद्यर्थी, ग्रामस्थ, कांदाळवन सहव्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, गटातील सदस्य, वनविभागाचे कर्मचारी श्री सुतार वनपाल परिमंडळ मालवण आणि कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र चे प्रकल्प समन्वयक श्री दीपक जाधव, मोहिनी भिंगारे, पूजा लुटे, दिगंबर तोरस्कर, जागृती गावंडे, सौरभ राऊळ, नयन घडशी,शुभम कांबळे, प्रकल्प सहाय्य्क श्री मयूर पानसरे, समृद्धी कांदाळगावकर, उपजीविका तज्ञ श्री केदार पालव, रोहित सावंत उपस्थित होते.