शिवसेना पिरावाडी शाखा प्रमुख पदी श्रीकांत उर्फ बंड्या पराडकर तर युवा शाखा प्रमुख पदी प्रियदर्शन तारी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली निवड जाहीर
आचरा-अर्जुन बापर्डेकर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोमवारी आचरा येथे आचरा विभागातील शिवसेना पदाधिका-यांची नियुक्त्या जाहीर केल्या.
यात आचरा पिरावाडी शिवसेना शाखा प्रमुख पदी श्रीकांत उर्फ बंड्या पराडकर तर युवा शाखा प्रमुख पदी प्रियदर्शन तारी यांची निवड शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी जाहीर केली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, दिपक पाटकर, दादा साहिल, तालुकाध्यक्ष विनायक बाईत, विश्वास गावकर,संतोष कोदे,मुझफ्फर मुजावर,डॉ प्रमोद कोळंबकर, संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, दत्ता वराडकर,अभय भोसले,यांसह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.