शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलमठ बाजारपेठ शाळा क्र.१ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

शिवसेना कलमठ शहर चा स्तुत्य उपक्रम
विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना कलमठ शहर च्या वतीने कलमठ बाजारपेठ शाळा क्र. १ मधील शाळेतील मुलांना मांन्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेतील 5 होतकरू विद्यार्थ्यांना धीरज मेस्त्री (ग्रामपंचायत सदस्य,कलमठ) आणि शिवसेना कलमठ यांच्यावतीने प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षी दत्तक घेऊन त्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच सर्व शाळेतील मुलांना देखील शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थित लाभली.
यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी शिवसेना कलमठ शहर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. असेच सामाजिक उपक्रम आपल्या माध्यमातून करत रहा, आपण लागणारी मदत कायम करत राहू. अशी ग्वाही यावेळी सतीश सावंत यांनी दिली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देखील उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. धीरज मेस्त्री आणि शिवसेना कलमठ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात.पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून चांगला उपक्रम राबविला. असे यावेळी नाईक म्हणाले.
यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, किरण हुन्नरे, विलास गुडेकर, महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, उपतालुका प्रमुख जितु कांबळी, युवासेना तालुका संघटक नितेश भोगले, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे,ग्रा.प. सदस्य सौ. हेलन कांबळी, धीरज मेस्त्री, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कीर्ती मेस्त्री, माजी अध्यक्ष अमोल कोरगावकर,आशिष कांबळी, आशिष मेस्त्री आदी शिवसैनिक, मुख्यध्यापक,विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.