वैभववाडी मधील तो काचेच्या पुल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

रविवार दिवशी तब्बल 2000 पेक्षा जास्त पर्यटकांनी हा पूल पाहण्याचा घेतला आनंद
वैभववाडी
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामधील नापणे धबधब्यावर झाला आहे. आज रविवार सुट्टीच्या दिवशी हा काचेचा पुल पाहण्यासाठी तब्बल दिवसभरात दोन हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी या पुलाला भेट देत पूल पाहण्याचा आनंद लुटला आहे. या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अवघ्या चार दिवसांपूर्वी झाले होते. मागील चार दिवसांमध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर, गोवा, बेळगाव, रत्नागिरी, या ठिकाणासह अन्य ठिकाणावरून तब्बल 5000 पेक्षा जास्त पर्यटकांनी हा पूल पाहण्याचा आनंद घेतला आहे
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या या पुलावर एका वेळी 25 जणच जाऊन हा पूल पाहू शकतात त्यामुळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला असल्याचे दिसत असून एकावेळी 25 जणांनाच आज एन्ट्री देत आहेत व सकाळी 10 ते वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही हा पूल सर्वांना पाहण्यासाठी खुला आहे





