युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्याकडून दारिस्ते शाळेत छत्र्यांचे वाटप

विद्यार्थी, पालकांमधून समाधान
कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्याकडून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या प्रमाणे यावर्षी जिल्हा परिषद शाळा दारिस्ते येथे छत्र्या वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर, युवासेना उपशाखाप्रमुख श्रीराम गुरव,लवू पवार, सुरेश लोके , अंगुली जाधव, संदीप गांवकर, मदन बागवे , दिलीप लोके, ओमकार गावकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.