मोदी सरकार हाय, हाय!

राहुल गांधींच्या कारवाईवरून कणकवलीत काँग्रेस आक्रमक

राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोन वर्ष तुरुंंवावासाची शिक्षा केली आहे. कर्नाटक च्या विधानसभा निवडणुकीत निरव मोदी, ललीत मोदी सारखे सगळेच मोदी चोर कसे? या विधानावर कोर्ट एवढी शिक्षा कशी काय करु शकते. याचा अर्थ मोदी देशात हिटलर शाही आणु पहात आहेत. राहुल यांची भारतजोडो यात्रेनंतर वाढलेली लोकप्रियता तसेच अदाणी प्रकरणात संसदेत जेपीसी चौकशीची केलेली मागणी यामुळे मोदी व भाजप कुठेतरी अडचणीत येणार आहे त्यामुळे दोन वर्षाची शिक्षा करुन त्यांच संसदेतल सदस्यत्व रद्द करण्याचा आणी विरोधी आवाज बंद करण्याचा हा डाव आहे. परंतु राहुल गांधी आणी काॅग्रेस या सर्वाला पुरुन उरेल व भाजप व मोदींचा हिटलर वादी बुरखा फाडेल. या साठी कणकवली तालुका काँग्रेस तर्फे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर नागेश मोरये, अनिल डेगवेकर, प्रविण वरुणकर, अजय मोरये, संतोष टक्के, प्रदीपकुमार जाधव, अनिकेत दहीबावकर, महादेव दहीबावकर, अमित मांडवकर, रुपेश साळुंखे, देवेंद्र दहीबावकर, साईनाथ दहीबावकर, गजानन मोरये, निलेश दहीबावकर, संदीप कदम, पंढरीनाथ पांगम उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!