आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात पार पडला.
आज शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी योगा किंवा प्राणायामाची नितांत गरज आहे आणि जर ते निरोगी राहिले तरच योगा दिन खऱ्या अर्थाने साजरा केल्याचे समाधान मिळेल.
मान्यवरांच्या उपस्थिती व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रशालेच्या योग शिक्षिका सौ. श्वेता गावडे मॅडम आणि सौ. निधी गुरव मॅडम यांनी विविध योगाची प्रात्यक्षिके तसेच विविध आसने इयत्ता Ukg ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून करून घेतली,तसेच जिल्हा व राज्यस्तरावर विविध योग स्पर्धेत प्रशालेचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी शिफा पटेल, भावेश घाडीगावकर, आयुष बागवे, गिरीजा मोहिते, या विद्यार्थ्यांनी काही उच्च स्तरावरील आसनांची प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सल्लागार श्री.डी.पी तानावडे सर तसेच आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम,को ऑर्डिनेटर निलेश घेवारी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख वैष्णवी मोरवेकर मॅडम आदी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रशाला शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
या सर्व कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी. पी.तानावडे सर, मुख्याध्यपिका सौ. अर्चना शेखर देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!