युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

जिल्ह्यात लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणार -संजना सावंत
महाराष्ट्र राज्य मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी 10:00 वा माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे 10/12 वी मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात १० वी व १२ वी मधील प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. .
विध्यार्थ्यानी जास्तीत जास्त चांगल शिक्षण कसे घेता येईल याकडे आत्तापासूनच पहावें जेणेकरून पुढील शिक्षण साठी उपयोग होईल असे आवाहन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ चे सरचिटणीस शिवाजी सावंत यांनी केले तसेच विध्यार्थ्यानी आपले ध्येय आजच निश्चित करावे असे सांगून युवा संदेश प्रतिष्ठान जिल्ह्यात करीत असलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे च्या वतीने दहावी बारावी तील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे करण्यात आला.
मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी युवा संदेश प्रतिष्ठान हे शाळा सुरु झाल्यावर गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करणारी पहिली संस्था आहे या संस्थेचे शैक्षणिक कार्य मोठे असून विध्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन केंद्र सुरु करावे असे आवाहन केले
विजय भोगटे = यांनी युवा संदेश प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे विविध कार्यक्रम राबवित आहे विध्यार्थ्यानी वशिला लावावा लागू नये असे मार्क्स मिळवावेत असे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
सुरेश ढवळ यांनी विध्यार्थ्यांना यश मिळवणे सोपं ते टिकवणे कठीण आहे म्हणून यापुढील शिक्षणात असेच सातत्य ठेवा असे सांगून युवा संदेश प्रतिष्ठान चे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे त्यांनी यू पी एस सी, एम पी एस सी स्पर्धा परीक्षाचे केंद्र सुरु करावे
संजना सावंत यांनी बोलताना जिजाऊ प्रतिष्ठान ने एक लाख वह्या दिलेल्या आहेत युवा संदेश च्या वतीने शैक्षणिक लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्याचे जाहीर केले.
पालकमंत्री नितेश राणे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आम्ही करीत आहोत तसेच जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने जिल्ह्यातील वह्या वाटप कार्यक्रम चा शुभारंभ करीत आहोत विध्यार्थ्यानी चांगले यश मिळविले त्यात शिक्षकांचाही मोठा वाटा आहे त्यामुळे शिक्षक व विध्यार्थी यांचे अभिनंदन केले विध्यार्थी घडविण्याचे काम कनेडी हायस्कूल चे शिक्षक करीत आहेत अगोदर ची पारोस्थिती व आत्ताची परिस्थिती बदलली आहे मोदी सरकार व फडणवीस सरकार हे विध्यार्थ्यांना शिक्षणा मध्ये प्रोत्साहन देत आहे शिकायची जिद्ध ठेवा चांगले मार्क्स मिळविण्यासाठी प्रयत्न ठेवा सरकार पाठीशी आहे गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचे आपण कसे घडलो याचे मनोगत पुढे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी ना ऐकवावे म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल यापुढे आपण विध्यार्थ्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहणार असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्र संचालन आभार प्रा.प्रसाद मसुरकर यांनी केले यावेळी सांगवे सरपंच संजय सावंत, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर, नरडवे सरपंच गणपत सावंत,गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच वैभव नार्वेकर, प्रफुल्ल काणेकर, माजी सरपंच मयुरी मुंज माजी प स सदस्य राजशी पवार, स्मिता मालडीकर शालेय समिती सदस्य संतोष सावंत, बावतीस घोन्सलवीस, प्रकाश सावंत पप्पू गावकर, रोबार्ट डिसोझा, संदीप उर्फ स्यांडू सावंत मिलिंद बोभाटे, श्रीकांत सावंत प्रदीप सावंत राजू जाधव तसेच विध्यार्थी पालक शिक्षक व युवा संदेश प्रेमी उपस्थित होते.