भाजपा कणकवली शहर मंडळ च्या वतीने तरंदळे मध्ये पालावरची दिवाळी साजरी

कणकवली भाजपा मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा अनोखा उपक्रम
भाजपाच्या वतीनेतरंदळे धनगरवाडी येथील भटके विमुक्त बांधवांसोबत दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पालावरची दिवाळी साजरी केली.
भारतीय सण अणि उत्सवांपासून दूर राहिलेल्या आदिवासी व भटक्या विमुक्तांशी आपले असलेले भावनिक नाते घट्ट व्हावे म्हणून ही त्यांच्या सोबत आपण साजरी करत दिवाळी चा आनंद द्विगुणित व्हावा या निमित्ताने पालावरची दिवाळी साजरी केली.
यावेळी कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मंडल उपा अध्यक्ष संदीप सावंत,पंचायत समिती कणकवली सदस्या संजना राणे, तरंदळे सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडी गावकर,सुनीलदत्त जाधव,माजी सरपंच सुधीर सावंत, डॉ सत्यवान राणे,संदेश सावंत,प्रशांत राणे,संतोष कदम,गजानन सावंत,विलास जाधव, सीताराम खरात,नरेश घाडीगांवकर,बाबुराव डोईफोडे, आनंद डोईफोडे,सखाराम खरात,अनिरुद्ध खरात,राजू जंगले,मंगेश डोईफोडे, शांताराम डोईफोडे,अविनाश डोईफोडे, रवींद्र डोईफोडे,शांताराम डोईफोडे, जानू खरात, तरंदळे गावातील ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.






