कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने दीड तास रेल्वे सेवा विस्कळीत

ट्रॅक वर थांबवलेल्या जनशताब्दी व तेजस दीड तासाने मार्गस्थ
कोकण रेल्वे मार्गावर विलवडे ते आडवली रेल्वे स्टेशन यादरम्यान रेल्वे ट्रॅक वर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जवळपास दीड तास विस्कळीत झाली होती. आज मंगळवारी झालेल्या पावसाच्या दरम्यान सायंकाळी 6.30 ते 6.45 या वेळेत रेल्वे ट्रॅक वर दरड चे मोठे खडक व दगड येऊन थांबल्याने रेल्वे ट्रॅक ठप्प झाला. त्यानंतर जनशताब्दी व तेजस एक्सप्रेस या राजापूर दरम्यान थांबवण्यात आल्या होत्या. दरम्यान जवळपास दीड तासात ही दरड हटवण्यात आल्याने थांबविण्यात आलेल्या दोन्ही रेल्वे मार्गस्थ करण्यात आल्या अशी माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली