सिंधुदुर्ग महावितरणच्या उपअभियंत्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

लोकसेवकाने सोलर पॅनल चेकलिस्टसाठी 5 हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सिंधुदुर्ग युनिटच्या पथकाने महावितरण कार्यालय कुडाळ येथील उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी
तक्रारदार हे अल्पी पोलराइज्ड टेकसोल प्रा. लि. या कंपनीमार्फत सौरऊर्जेसंबंधित काम करतात. त्यांनी बसविलेल्या सोलर पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्यासाठी उपअभियंता जाधव यांनी ०६ मे २०२५ रोजी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीदरम्यान स्पष्ट झाले.
या प्रकारावरून ०५ मे २०२५ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. ०६ व ०७ मे रोजी पडताळणी करण्यात आली. यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) चे कलम ७ अंतर्गत गु.र.नं. १६६/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक मनोज जिरगे,सहाय्यक अधिकारी: पो.ह. पालकर, पो.ह. रेवणकर, पो.ह. अजित खंडे यांनी कारवाई केली. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे शिवराज पाटील,संजय गोविलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे, अरुण पवार, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिगंबर वालावलकर /कणकवली