जिल्हा खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देवगड तहसीलदार आर.जे. पवार यांच्याकडे

जिल्ह्यातील मायानिंग च्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या कार्यभार सोपवलेल्या आदेशाला महत्त्व
सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या पदाचा कार्यभार तहसीलदार चैताली सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत देण्यात आला आहे. आपला मूळ कार्यभार सांभाळून हा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली